‘गणपत’ नंतर टायगरचे सलग २ चित्रपट…

tiger shorf

मुंबई : कोरोना परिस्थितीमुळे बॉलीवूड मधील बरेच प्रोजक्ट पुढे ढकलण्यात आले, अनलॉक नंतर बॉलीवूड मधील सिनेमांची शूटिंग परत सुरु करण्यात आली, परिस्थिती पुरेशी स्थिर झाल्यावर पुन्हा काम सुरू करण्यासाठी सुपरस्टार आपले आगामी वेळापत्रक ठरवत आहेत.

अनलॉक नंतर राखडल्येल्या कामाला पुन्हा सुरुवात झाली, आता टायगर देखील पुन्हा वापसी करण्यास सज्ज झाला असून तो सलग 3 धमाके करणार आहे. यात टायगरच्या ‘गणपत’, ‘हिरोपंती-2′ आणि ‘रॅम्बो’ या चित्रपटांचे प्लॅनिंग तयार झाले आहे.

सर्वात प्रथम टायगर हा ‘गणपत’चे शूटिंग सुरू करणार आहे. विकास बहल द्वारा दिग्दर्शित चित्रपटात टायगर हा एका बॉक्‍सरची भूमिका साकारत आहे. यासाठी त्याने ट्रेनिंगही सुरू केले आहे. ट्रेनिंगचा एक व्हिडीओ देखील टायगरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर आहे.