मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने शहरातील जनजीवन दुसऱ्या दिवशीही विस्कळीत 

मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने शहरातील जनजीवन दुसऱ्या दिवशीही विस्कळीत 

औरंंगाबाद : मंगळवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यात सर्वदुर हजेरी लावलेल्या पावसाने सायंकाळी तर मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली होती. मेघगर्जनेसह आलेल्या मुसळधार पावसाने शहराला चांगलेच तासभर धुवून काढले होते. जोरदार पाऊस झाल्यामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने त्या पाण्यातून मार्ग काढतांना वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडाली होती. दरम्यान बुधवारी देखील अनेक दुकानदार तसेच अनेकांच्या घरातील तळ मजल्यात गेले पाणी काढण्यात नागरिक व्यस्त होते. तर अनेक रस्ते मलबा पडल्याने बंद असल्याची स्थिती पाहायला मिळाली.

मंगळवारी सकाळपासूनच शहरावर दाट काळ्या ढगांनी गर्दी केली होती. सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास आलेल्या पावसाने जवळपास एक ते दिड तास शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात सर्वदुर हजेरी लावली होती. त्यानंतर दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी शहरावर काळ्या ढगांनी गर्दी केलेली होती. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने शहरात हजेरी लावली.

जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. तसेच शहरातून वाहणाऱ्या नदी-नाल्यांना पुर आला होता. सखल भागात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढतांना दुचाकी वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर अनेक भागातील विजपुरवठा खंडीत झाला होता. तो बुधवारी सकाळी सुरु करण्यात आला. तर रात्रभर अग्निशमन विभागाने विविध ठिकाणी जात साचलेले पाणी काढले.

महत्त्वाच्या बातम्या