पुणेकर अनुभवणार पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीग चा थरार

चौथ्या पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीगमध्ये अनेक नावाजलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग

पुणे: अतिशय उत्कंठावर्धक अशा चौथ्या पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीग २०१७ ची  विलो इव्हेन्ट्सने  घोषणा करण्यात आली असून आकर्षक अशा नवीन स्वरूपातील या शर्यती १७, १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी पुण्यात  आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेतील सहभागी रायडर्स तीन दिवसात एकूण ६ मोटो-प्रकारांमध्ये सहभागी होतील.

पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीग ही भारताताली आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वाधिक चर्चिली गेलेली सुपरक्रॉस शर्यत असून जगातील पहिलीच फ्रॅन्चायसीवर आधारित असणारी सुपरक्रॉस शर्यत आहे. ही शर्यत क्रिकेटच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या आयपीएल (Indian Premier League : IPL) प्रकारावर आधारित असून या स्पर्धेत एकूण ३५ राष्ट्रीय आणि ११ आंतरराष्ट्रीय रायडर्स सहभागी होणार असून त्यांच्यामध्ये विजेतेपदसाठी चुरशीची लढत होणार आहे . या कार्यक्रमात दोन खुल्या गटातील डेमो – रायडर्स देखील सहभागी होणार आहेत. भल्ला रॉयल, आय.एन.के. रेसिंग, पी.बी.रेसिंग, ग्रीश्म टीम आणि लिलेरिया मोटरस्पोर्ट्स या संघांनी या शर्यतींमधील त्यांचा सहभाग निश्चित केला आहे.

प्रत्येक राऊंडमधील कामगिरीनुसार टीम रायडर्सना पॉईंट्स मिळतील. प्रत्येक शर्यतीसाठी वेगळे पॉईंट्स देण्यात येणार असून सर्व शर्यतींचे एकत्रित पॉईंट्स या स्पर्धेचा विजेता ठरवतील. अशा प्रकारच्या स्वरूपामुळे सर्वच शर्यती अटीतटीच्या ठरणार आहेत! संघांचा लिलाव ३ नोव्हेंबरला पुण्यात आयोजित केला आहे. याबाबत बोलताना माजी नामांकित आंतरराष्ट्रीय रायडर आणि विलो इव्हेंट्सद्वारे घेण्यात आलेल्या या शर्यतींचे संचालक श्री. ईशान लोखंडे म्हणाले, सुपरक्रॉस स्पर्धांनी भारतात पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवली असून पुणे हा वारसा पुढे नेण्यात कायमच अग्रेसर असते. या स्पर्धांचे नवीन स्वरूप सर्वांना नक्कीच उत्तेजन देईल आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या  प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. सध्या उत्तम नियोजन केलेल्या खेळांच्या स्पर्धा ही काळाची गरज आहे आणि प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी आवश्यक बाब बनली आहे. या स्पर्धांचा मुख्य उद्देश प्रेक्षकांना थरारक शर्यतींचा अनुभव देणे आणि त्याच वेळी त्यांची करमणूकदेखील करणे हा आहे!

 

 

 

You might also like
Comments
Loading...