वेब सिरीजच्या माध्यमातून ‘ही’ अभिनेत्री प्रेक्षकांना घालतेयं भुरळ

टीम महाराष्ट्र देशा : सध्या ‘लिटील थिंग्स’ नावाची वेब सिरीज नेटफ्लिक्सवर चांगलीच पसंत केली जात आहे. या वेब सिरीजमध्ये मराठी अभिनेत्री मिथिला पालकर आणि अभिनेता धृव सेहगल आहेत. सध्या या वेब सिरीजमधून मिथिला प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घालत आहे. नुकतेच मिथिला हिने आपले छायाचित्र इंस्टाग्रामवर टाकले असून हे छायाचित्र प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घालत आहेत.

मिथिला या छायाचित्रांमध्ये राणी रंगाच्या सलवारमध्ये अतिशय सुंदर दिसत असून तिच्या निरागस चेहऱ्याने ती सगळ्यांच्याच मनात बसली आहे. गल्स इन सिटी, चॉपस्टिक, मुरांबा, कट्टी बट्टी अशा प्रसिद्ध वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये तिने उत्तम काम केले आहे. त्यामुळे सध्या तिचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. दिग्दर्शक करण जोहर यांच्या ‘गल्स गॉट टॅलेंट’ या नव्या चित्रपटात ती दिसणार आहे.

मिथिला हिने मास मिडियामध्ये आपले शिक्षण पूर्ण केले असून ती सध्या वेगवेगळ्या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे तिचे इंस्टाग्रामवर बरेच फॉलोअर्स देखील आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत सध्या मिथिलाचे नाव अग्रस्थानी आहे. तिचा नाजूक चेहरा आणि अभिनय याने सगळ्यांनाच वेड लावले आहे. मिथिला पालकर ही अभिनेत्री, युट्युबर आणि गायिका आहे.

मिथिला युट्युबवर पहिल्यांदा प्रेक्षकांपुढे आली. त्यांनतर तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढत गेला. आता तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळत असून तिच्या अभिनयाला शाबासकी देखील मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...