‘दर्पण’ वृत्तपत्राच्या माध्यमातून जांभेकरांनी राष्ट्रभक्ती व समाजसेवेचे बीज महाराष्ट्रात रुजवले- चंद्रकांत पाटील

मुंबई : आजचा दिवस सर्वत्र ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर(Balshastri Jambhekar) यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र सुरु केले. याच कारणामुळे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर सर्व स्तराहून पत्रकारिता दिनाच्या शुभेच्छा देण्यात आहे.

याला अनुसरून भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. ‘दर्पण’ वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रभक्ती व समाजसेवेचे बीज महाराष्ट्रात रुजवले. या राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन. मराठी पत्रकार बंधू-भगिनींना पत्रकारिता दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.’

दरम्यान, दर्पणचा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित झाला होता. त्यावेळी हा अंक मराठी तसेच इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रकाशित केला जायचा. एक इंग्रजी आणि एक मराठी असे दोन स्तंभ या वृत्तपत्रात असत. मराठी जनतेला देशात काय सुरु आहे हे समजावे म्हणून एक स्तंभ मराठीत लिहिण्यात येत असत. तर वृत्तपत्रात काय लिहिलंय हे ब्रिटिशांना समजावे म्हणून दुसरा स्तंभ इंग्रजीत लिहला जायचा.

महत्वाच्या बातम्या: