Share

Nushrratt Bharuccha | ‘अकेली’ मध्ये दिसणार ‘नुसरत भरुचा’चा थ्रिलर अंदाज

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी नुसरत भरूचा ही सर्वांना परिचित आहे. नुसरत स्वतःची वेगळी ओळख निर्माण होईपर्यंत वेगवेगळ्या पात्रांसह स्वतःला सिद्ध करत राहिली. आज आपल्या मेहनतीच्या जोरावर नुसरत एक हिट अभिनेत्री आहे. सध्या नुसरत तिच्या ‘अकेली’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

नुसरतच्या आगामी चित्रपट ‘अकेली’चे आज मोशन पोस्टर रेलीज झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निवेदित चित्रपट निर्माते प्रणय मेश्राम यांनी केले आहे. यापूर्वी प्रणय मेश्राम यांनी क्वीन, कमांडो 3 यासारख्या चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर, विकी सिडाणा आणि दशमी स्टुडिओचे शशांक शहा अकेली चित्रपटाचे निर्माते आहे.

अकेली चे पहिले मोशन पोस्टर

या चित्रपटाच्या माध्यमातून नुसरत पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिने तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला तिने कॅप्शन दिले आहे, – अपने पे आ जाए…तो एक अकेली काफी हैं! नुसरत ने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे.

अकेली हा चित्रपट इराण वर आधारित आहे. इराण मधील वाळवंटात अडकलेल्या लोकांची प्रतिकूल परिस्थिती आणि तिथली एकूणच स्थिती या चित्रपटात वर्णविली आहे. या चित्रपटाचे हे पोस्टर बघून असे वाटते की, नुसरत यावेळीही चाहत्यांसाठी एक वेगळा विषय घेऊन आली आहे.

नुसरतची सोशल मीडिया वर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. ती तिचे अनेकदा फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ‘प्यार का पंचनामा’ या मूव्ही मधून नुसरत ने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात नुसरत सोबत कार्तिक आर्यनही मुख्य भूमिकेत होता.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी नुसरत भरूचा ही सर्वांना परिचित आहे. नुसरत स्वतःची वेगळी ओळख …

पुढे वाचा

Entertainment