आमच्याविरुद्ध तीन पैलवान एकत्र, तरीही पुणे महापालिका आम्हीच जिंकू- चंद्रकांत पाटील

chandrakant patil

पुणे:- राज्य सरकारच्यावतीने अलीकडेचं पुणे महानगरपालिकेत 23 गावांच्या समावेशावर शिक्कामोर्तब केले आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या 23 गावांवरून आता राजकारण चांगलंच तापलंय. 2022 च्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादीने मोठी खेळी खेळलीय. तर, सत्ताधारी भाजप मात्र गावांच्या समावेशाआधी विकासनिधी देण्याची मागणी करत आहे.

दरम्यान, जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे आमच्या विरुद्ध तीन तीन पैलवान एकत्र आले, तरी आम्हीच पुण्याची महापालिका जिंकू याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. काल पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. या तिन्ही कायद्यांची समीक्षा करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. निवडणूक आयोग, हायकोर्ट, ईडी, सुप्रीम कोर्ट या सर्व संविधानिक व्यवस्था आहे. हे केंद्र सरकारने आणि एकूणच भाजपने मान्य केले आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-