लोकलच्या धडकेत ३ महिलांचा मृत्यू

मुंबई : रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या तीन महिला मजुरांचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शताब्दी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. मालाड आणि कांदिवली या स्थानकांदरम्यान दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. ही लोकल बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जात होती.

याचदरम्यान काही महिला ट्रॅकवर काम करत होत्या. एकाचवेळी दोन ते तीन ट्रॅकवरून लोकल ट्रेन येत असल्याने त्या गोंधळून गेल्या. कोणती ट्रेन कोणत्या ट्रॅकवरून जात आहे, याचा अंदाज त्यांना आला नाही. या गोंधळामुळे त्या महिला चुकीच्या ट्रॅकवर उभ्या राहिल्या. याचवेळी लोकलची धडक त्या महिलांना लागली आणि त्या तीन महिलांना आपले प्राण गमवावे लागले.

Comments
Loading...