हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तीन वारकऱ्यांचा मृत्यू

blank

 टीम महाराष्ट्र देशा : तरडगाव ते फलटण माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना तीन भाविकांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलुबा तुळशीराम सोलने (वय ६५ रा. सिंदखेड राजा जि. बुलडाणा) व सुभाष चंद्रभान गायकवाड (वय ५५ रा. मुकुंदवाडी ता. जि. औरंगाबाद) व अन्य एक अशा तीन भाविकांचा पायी चालत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने शोककळा पसरली असून माऊलींच्या पायी वारीत आलेल्या या मृत्यूमुळे अनेक भाविकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. फलटणचे प्रांत संतोष जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील, तहसीलदार विजय पाटील, व मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी या दिंडीतील लोकांची भेट घेऊन या घटनेबाबत दुःख व्यक्त केले.

रायगडावरील सेलिब्रेटींचं फोटोसेशन निंदनीय – संभाजीराजे

इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण