औरंगाबादेतून पुन्हा तीन दुचाकी लंपास, वाहनचोरांवर पोलिसांचा वचक नाही?

औरंंगाबाद : शहराच्या विविध भागातून वाहन चोरट्यांनी तीन दुचाकी लंपास केल्या आहेत. दररोज वाहनचोरीचे सत्र सुरु आहे. सिटी चौक पोलीस ठाणे वगळता, वाहनचोरी संदर्भात शहरात मोठी कामगिरी करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनचोरांवर पोलिसांचा वचक राहिला नाही का? असा असवल नागरिक करीत आहे.

उमेश रमेश चव्हाण (वय ३६,रा.जयभवानीनगर,मुकुंदवाडी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईएम-२९४४) चोरट्याने १४ मे रोजी घराजवळून चोरून नेली. दुसऱ्या घटनेत, भगवान गोविंदराव सदाशिवे (रा.आंबेडकरनगर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीएल-४४०५) चोरट्याने ४ जून रोजी घाटी रूग्णालयातील ओ.पी.डी. समोरून चोरून नेली.

दिलीप धनुजी केराळे (वय २४, रा.जाधववाडी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईएम-९८९७) चोरट्याने ७ जून रोजी डि-मार्ट मॉलच्या पार्कींग मधुन चोरून नेली. विविध भागातून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे मुकुंदवाडी, बेगमपुरा आणि जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP