काँग्रेसपेक्षा भाजपच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती झाली- फडणवीस

Devendra-Fadnavis

खामगाव : गत अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती झाली असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे . शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात चार दिवसीय पश्चिम विदभार्तील सर्वात मोठा कृषी महोत्सवा चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महोत्सवात फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांचा दावा

गत अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती झाली असून ही प्रगती केवळ कागदावरच नव्हे, तर ती दृष्य स्वरुपात आहे. भाजपच्या सरकारने   काँग्रेसच्या सरकारपेक्षा तिप्पट आर्थिक तरतुद केल्यामुळे हे शक्य झालं. काँग्रेसच्या कार्यकाळात २० ते २२ हजार कोटी तरतुद असायची, ती आता ६६ हजार कोटी रुपयांवर गेली आहे.मागच्या कर्जमाफीत संपूर्ण विदर्भासाठी २५० कोटी मिळाले, तर यावेळच्या कर्जमाफीत एकट्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ११०० पेक्षा अधिक रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांना यावेळी देण्यात आलेली कर्जमाफी ही मागच्या सरकारपेक्षा जास्त फायदेशीर ठरल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

1 Comment

Click here to post a comment
Loading...