दोन दिवसांत उचलनार तीन हजार मेट्रिक टन कचरा: डॉ. पुरुषोत्तम भापकर

औरंगाबाद: शुक्रवार सोळा मार्चला कचरा कोंडीस एक महीना पूर्ण होत आहे. शहरात विविध ठिकाणी काही दिवसांपासून सुमारे तीन हजार मेट्रिक टन कचरा साचला आसून हा कचरा येत्या दोन दिवसांत उचलण्यात येईल. व कचऱ्याचे  ओला-सुका वर्गीकरण करून ज्या त्या वॉर्डाचा कचरा तिथेच जिरवून कंपोस्टिंग करण्यावर भर दिला जानार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.

प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कचरा वर्गीकरणास आपल्या पासून सुरवात करत घरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करूनच मनपाच्या सफाई कर्म द्यावा. जेणेकरून ओल्या कचऱ्यावर  योग्य प्रक्रिया करून पुनर्वापर करता येईल. प्रत्येक वार्डासाठी एक एकर जागा लागणार असून या जागेचा वापर कचरा डम्पिंग नव्हे तर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जानार आहे.

शहरातील ९ झोनमधील अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हास्तरीय अनुभवी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून औरंगाबाद विभागात पाच लाख युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोमवारी विभागीय आयुक्तालयात डॉ. भापकर यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांनी दिलेल्या पंचसूत्रीनुसार ठरलेल्या कार्यवाहीचा आढावा त्यांनी घेतला.

You might also like
Comments
Loading...