आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा ; ससूनमध्ये एका बेडवर तीन रुग्णांवर उपचार

sasoon

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्राकडे बोट केलं असून विरोधी नेते मात्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या हि सर्वांच्याच चिंतेत भर पाडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी अनेक रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. पुणे शहरातही कोरोना रुग्णांची स्थिती अत्यंत वाईट बनत चालली आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात कॅज्युअल्टी वार्डमधील आणखीच भयानक परिस्थिती समोर आली आहे. याठिकाणी एकाच बेडवर प्रत्येकी तीन-तीन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. विशेष म्हणजे कॅज्युअल्टी वॉर्डची रुग्ण क्षमता ४० एवढी आहे. पण ससूनमध्ये दररोज ६० नवीन कोरोना रुग्ण येत आहेत. याची वाढीव ताण या वॉर्डवर पडत आहेत. ससूनमध्ये नवीन रुग्ण दाखल झाल्यानंतर या वॉर्डातील रुग्ण हॉस्पिटलमध्ये इतरत्र हालवली जात आहे. ज्यामध्ये रुग्णांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन कारावा लागत आहे.

पुण्यासहित राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून अनेक रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहे, तर काहींना जमिनीवर पडून उपचार घ्यावे लागत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यातील खाजगी आणि शासकीय आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आल्या असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP