प्रेमविवाह न करण्याची शपथ दिल्या प्रकरणी तीन जण निलंबित,विद्यार्थिनींनी छेडले आंदोलन

अमरावती : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ या जागतिक प्रेमदिनाच्या दिवशी अमरावतीच्या महाविद्यालयात विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची अजबगजब शपथ देण्यात आली. प्रेम, प्रेम विवाह किंवा हुंडा घेऊन लग्न न करण्याची शिक्षकांनीच या विद्यार्थिनींना शपथ दिली दिल्याने एकच खळबळ उडाली होती.

अलीकडे तरुण- तरुणींच्या प्रेम प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आज अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ देण्यात आली आहे.

Loading...

‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’ अशी शपथ विद्यार्थिनींकडून घेण्यात आली.

दरम्यान, आता विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ दिल्या प्रकरणी तीन जण निलंबित करण्यात आले आहेत. दुसरीकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी याविरोधात मैदानात उतरल्या आहेत.त्यांनी कॉलेजबाहेर आंदोलन केले असून तिघांचं निलंबन मागे घ्या, अशी मुलींची भूमिका आहे. जर निलंबन मागे घेतले नाही तर कॉलेजला टाळा ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका