‘देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील तीन ठाण्यांचा समावेश’, जयंत पाटलांची माहिती

‘देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील तीन ठाण्यांचा समावेश’, जयंत पाटलांची माहिती

jayant patil

सांगली : सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ३ पोलीस स्टेशनचा समावेश झाल्याची माहिती पाटील यांनी दिली. यवतमाळ, चंद्रपूर आणि शिराळा या तीन पोलीस स्टेशनचा या यादीत समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलत असतांना पाटील म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर आणि शिराळा येथील पोलीस ठाण्यांचा समावेश आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये झालाय. दीक्षित गेडाम यांनी सर्व पोलीस स्टेशन आयएसओ प्रमाणित करण्याची मोठी मोहीम हाती घेतली. राज्यात अनेक चांगले पोलीस स्टेशन आहेत. तसेच माझी पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत बसलेल्या नेत्यांना विनंती आहे कोणतीही केस रदबदली घेऊन न जाता फक्त चहा घ्यायला जाऊन या,’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलत असतांना ‘पोलिसांनी ही व्यवस्था दुरुस्त केलीय हे पाहण्याचं आपल्याला भानच नसतं. सरकारी अधिकाऱ्याला देखील मन असते. आपण त्याला प्रोत्साहन देण्यचे काम करायला हवे. आपण केस असेल तरच फोन करतो. पोलिसांना फोन करून दम देण्याची प्रथा आता वाढली आहे. ‘हे करा, ते करा, बघतोच तुम्हाला, इकडं घालवतो, तिकडे घालवतो’ असं बोललं जातं. त्यांना नोकरीच करायची असते, पण ही लोकं काम करत असतात,’ असेही यावेळी पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या