पुण्यात तरुणीवर सामुहिक बलात्कार; दोघांना अटक

Gang-rape

पुणे: कोंढवा परिसरात एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तिघा तरुणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे तर एक साथीदार फरार आहे.
सतीश जयपाल माने (२३), बालाजी मारुती शिंदे (३१) दोघेही रा. सिद्धार्थनगर कोंढवा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर तिसऱ्या फरार साथीदाराचे नाव अजून समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणीचे कुटुंबियाशी भांडण झाल्याने ती घरातून बाहेर पडली आणि नातेवाईकांकडे जाण्यासाठी एका रिक्षात बसली. काही वेळातच रिक्षाचालकाने रिक्षा एका निर्जनस्थळी नेऊन तेथे आपल्या दोन मित्रांसह मिळून तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर एक आरोपी फरार आहे.