वेश्याव्यवसायातून अल्पवयीन बांग्लादेशी तरुणीची सुटका

ठाणे  : वेश्याव्यवसाय करायला प्रवृत्त करणा-या तीन जणांच्या टोळीला कल्याण येथून अटक करण्यात आली. यावळी एका 17 वर्षीय बांग्लादेशच्या तरुणीची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी (एएचटीसी) शाखेने एका लॉजवर धाड टाकून तेथील दलालासह मॅनेजर आणि वेटर या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दलाली करणारा इब्राहिम दस्तगीर शेख (४१), लॉज व्यवस्थापक हरिप्रसाद शेट्टी आणि वेटर रमाकांत राऊत (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत सुटका करण्यात आलेली पीडिता मुळची बांग्लादेशमध्ये राहणारी असून सध्या ती कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका झोपडपट्टीत वास्तव्याला आहे.

Comments
Loading...