कामोठ्यात ‘राडा’;राज ठाकरेंच्या बैठकीनंतर मनसे आक्रमक

mns

पनवेल : मनसे आणि फेरीवाले यांच्यातील संघर्ष आता अजूनच तीव्र झाला आहे. विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना झालेली मारहाण आणि त्यानंतर संजय निरुपम यांचं चिथावणीखोर ट्विट याचा पुरेपूर बदला घेत मनसे कार्यकर्त्यांनी कामोठ्यातील अनधिकृत फेरीवाल्यांना मारहाण करत हुसकावून लावले आहे.

दरम्यान , विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर मनसे पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती, यात त्यांनी मला मार खाणारे कार्यकर्ते नको तर मार देणारे कार्यकर्ते हवेत, पुढील आंदोलन नियोजनबद्ध झालं पाहिजे अशी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर लगेचच कामोठ्यात याचे पडसाद पाहायला मिळाले आहे.यानंतर सकाळी कामोठे पोलिसांनी मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.