Amol Mitkari | मुंबई : राज्यात राज्यसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला. तर भाजपने यश संपादन केलं. तर यानंतरच महाविकास आघाडीच्या ऱ्हासाला सुरवात झाली. एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजप सोबत जात राज्यात नवं सरकार स्थापन केलं. यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले असल्याचा खळबळजनक आरोप अमोल मिटकरी यांनी केला. प्रत्येक आमदाराला ७ कोटी रुपये दिले असल्याचा दावा त्यांनीही त्यांनी केला आहे. मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर हे तीन आमदार नेमके कोण आहेत या बाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाल्या आहेत.
यावेळी पुढे बोलताना मिटकरी म्हणले कि, सध्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे. चार एकर जमीन विकली तर २० लाख रुपये येतील. मात्र, इकडे आमदारांची मते वळवण्यासाठी एका आमदाराला सात-सात कोटी रुपये द्यावे लागतात. उमेदवारासाठी जो घोडेबाजार सुरु आहे तो धक्कादायक आहे. आम्हालाही इतर पक्षांकडून गटनेते पदाची ऑफर देण्यात आली आहे. या बदल्यात एक मर्सडिज, दोन लाख रुपये महिना आणि वर दोन खोकी देऊत, अशी ऑफर देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Krunal Pandya : कृणाल पंड्या बनला बाप! पोस्ट शेअर करत मुलाच्या नावाचाही केला खुलासा, पाहा PHOTO!
- Nitin Gadkari | आता जे राजकारण पाहतो, ते केवळ शंभर टक्के सत्ताकारण आहे – नितीन गडकरी
- Nitin Gadkari : राजकारण केव्हा सोडू, केव्हा नको असे वाटतेय; नितीन गडकरींनी सांगितली मन की बात
- Monkeypox | केरळ पाठोपाठ दिल्लीतही आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण; WHO कडून आरोग्य आणीबाणी घोषित
- Nitin Gadkari | … उंदरासारखे आमचे फोटो लावतात, स्वतःचा मोठा फोटो लावतात – नितीन गडकरी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<