fbpx

औरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी

aurangabad MIM

औरंगाबाद:  सार्वजनिणनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आणि महापौरांचा राजदंड पळवुन नेण्याचा प्रयत्न करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आज एमआयएमचे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि सैय्यद मतीन सैय्यद रशीद यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. पोलिसांच्या रिमांड यादीनुसार प्रथम वर्ग नञयाय दंडाधिकारी आर.आर. मावतवाल यांनी त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली.

महापालिकेच्या सर्वसधारण सभेत पाण्याच्या प्रश्नावरून सभागृहात खुर्च्या भिरकावणाऱ्या एमआयएच्या तीन नगरसेवकांचे सभासदत्व कायमचे रद्द करण्यात आले होते. औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी पाणीप्रश्नावरून गोंधळ घालत खुर्च्या फेकल्या होत्या.

दोन्ही नगरसेवकांविरोधात भा.दं.वि. कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांना विशेष सरकारी वकील रविंद्र अवसरमोल आणि किशोर जाधव यांनी विरोध केला. वरील दोघांविरुद्ध यापुर्वी सुद्धा अशाचप्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले. त्यांना जामीन मंजुर केल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकुन तपास कामात अडथळा निर्माण करु श्कतात. त्यांना जामीन मंजुर करु नये, अशी विनंती त्यांनी केली. सुनावणीअंती न्यायालयाने वरील दोघांचेही जामीन अर्ज नामंज़ुर केले.

शहरातील पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय नगरसेवक जाब विचारत असताना. नियमित पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. जेवढी वसुली होते त्या पद्धतीनं पाणी पुरवठा व्हावा, असं शिवसेनेकडून सूचित करण्यात आलं. त्यावर एम आय एम कडून आक्षेप घेण्यात आला. यावेळी शाब्दिक बाचाबाची करून एमआयएम नगरसेवक राजदंड पळवण्यासाठी पुढे आल्यान सुरक्षारक्षक पुढे सरसावले. त्यावेळी एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांनी त्यांना पाठीमागे धक्का देत खुर्च्या फेकल्या.
जफर बिल्डर आणि सय्यद मतीन यांचं नगरसेवकपद कायमसाठी रद्द करण्यात आलं आहे. यापूर्वीही वंदेमातरम वरून पालिकेत जो राडा झाला होता. त्यामध्ये हे दोन्ही नगरसेवक आघाडीवर होते. त्यावेळी सभागृहाची तोडफोड केल्यामुळे एक दिवसासाठी त्यांच सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं.