ठरलं ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठे बहुसदस्यीय तर कुठे एक सदस्यीय

ठरलं ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठे बहुसदस्यीय तर कुठे एक सदस्यीय

uddhav thackeray

मुंबई : राज्यात कोरोनास्थितीमुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. तर, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, आदी  महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील युती-आघाडीची समीकरणे बदलल्यानंतर होणाऱ्या या महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महत्वाच्या असून सर्वच त्यासाठी तयारीला लागले आहेत.

दरम्यान, ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. तर, मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

वॉर्ड कि प्रभाग पद्धत यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर न्यायालयात जाऊ असा इशारा दिला होता. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी अशी काही नेत्यांची भूमिका होती. याच पार्श्वभूमीवर चर्चेअंती आज वरील निर्णय सरकारने घेतल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या