नाशकात पाण्याची टाकी कोसळून ३ मजूर ठार; ३ गंभीर जखमी

नाशिक : नाशिकमध्ये गंगापूर रोडवर सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पातील पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन मजूर जागीच ठार झाले. या दुर्घटनेत दोन मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेत महंमद बारीक (वय, ३२ रा. मूळ बिहार ) बेबी सनबी खातून (वय २८ मूळ रा. बिहार) अशी मृतांची नावे आहेत. जखमींपैकी सुदाम गोहीर (३०, मुळ रा. ओडिशा, पश्चिम बंगाल), अनामी धना चंदन (५० मूळ रा. दिल्ली) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृतांची संख्या तीन झाली आहे. १ गंभीर जखमी आहे. खातून यांना लहान चार मुले आहेत. हे दोघेही मजूर म्हणून प्रकल्पात राहत होते. जखमी कामगारांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.