fbpx

VIDEO : पुण्यात पुन्हा बालेवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती ; स्लॅब टाकताना तीन कामगारांचा मृत्यू

पुणे: ऐन दिवाळीत पुण्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील दत्तवाडी भागातील गणेशमला येथे पाटेसेया कन्स्ट्रक्शनच्या 10 माजली नवीन इमारतीचे बांधकाम सुरु होते. या ठिकाणी १० व्या मजल्याचा स्लॅब टाकत असताना चार कामगार स्लॅब टाकण्याचे काम करत होते, मात्र अचानक स्लॅबचा सपोर्ट सुटल्याने स्लॅब कोसळला यामध्ये एक कामगार जखमी झाला असून तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. जखमीला उपचारासाठी ग्लोबल हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान घटनेची माहिती कळतास पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे तर पुढील मदतकार्य सुरु आहे.

बिल्डरकडून कोणत्याही प्रकारचे संरक्षक साहित्य वापरले जात नव्हते. या आधी बांधकामाच्या बाहेर अपघात झाले आहे. या बाबत अनेक वेळा बिल्डरला सांगूनही काळजी घेतली गेली नाही. निष्काळजी बिल्डरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जावी.

– शंकर पवार , स्थानिक नगरसेवक

पहा व्हिडीओ