मुखेड जवळील कार-दुचाकी अपघातात तीन ठार

नांदेड (प्रतिनिधी) : राज्य मार्ग रस्त्यावरील मुखेड शहराच्या महाजन पेट्रोल पंपाजवळ कार आणि मोटार सायकल चा गुरुवारी भीषण अपघात झाला यात चुलता पुतण्यासह तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

शिरूर दबडे येथील धोंडिबा सूर्यकांत होलगिर वय 27 वर्ष आणि नामदेव मारुती होलगिर वय 50 वर्ष हे दोघे शेती विषयक कामासाठी मुखेड शहरात आले होते. दुचाकीवरून परत गावाकडे जात असताना मुखेड -जांब रस्त्यावर महाजन पेट्रोल पंपाजवळ कर्नाटकातील धारवाड येथून मुखेड मार्गे तेलंगणा जाणाऱ्या (KA 27 M 1930) या कार ने जोरदार धडक दिली आणि दुचाकी वरील नामदेव होलगिर यांचा जागीच मृत्यू झाला तर धोंडिबा होलगिर यांचा उपचारास उशीर झाल्याने रुग्णालयाबाहेर मृत्यू झाला.

कार मधील चालका शेजारी बसलेल्या हणमंत केलूरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
धोंडिबा होलगिर यांचा तीन वर्षपूर्वी विवाह झाला होता त्याच्या पश्चात आई वडील पत्नी एक भाऊ चार बहिणी असा परिवार तर नामदेव होलगिर यांच्या पश्चात पत्नी दोन मुली दोन मुले असा परिवार आहे मात्र घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्याचं कुटुंब उघड्यावर आलंय.