fbpx

चित्रपटगृहात राष्ट्रगीता दरम्यान उभे न राहिल्यामुळे तीन काश्मीरी तरूणांना अटक

National Anthem India

हैदराबाद : येथील एका चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे न राहिल्याने पोलिसांनी तीन काश्मीरी तरूणांना अटक केली. उमर फैयाज लूनी, मुदाबीर शब्बीर आणि जमील गुल अशी अटक करण्यात आलेल्या तरूणांची नावे आहेत. हे तिघेही येथील एका खासगी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. या तिघांची तक्रार चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनकाने पोलिसांकडे केली होती.राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कारवाई करत त्यांनी अटक केली. यानंतर पोलिसांनी त्यांना जामिनावर सोडले.