सुप्रीम कोर्टाची हॅट्रीक, दिवसभरात दिले ‘हे’ तीन महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आज निकाल देण्याची हॅट्रीक लगावली आहे, आज दिवसभरात देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारे तीन निकाल न्यायालयाकडून देण्यात आले आहे. यामध्ये प्रमोशनमधील आरक्षण, आधार सक्ती आणि हायकोर्ट तसेच सुप्रीम कोर्टमध्ये चालणाऱ्या सुनावणीचे थेट प्रक्षेपणास परवानगी देण्याच्या निर्णयाचा समावेश आहे.

1. न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम सरकारी नौकरीतील प्रमोशनमध्ये आरक्षण देण्याच्या खटल्यावर सुनावणी घेण्यात आली. यामध्ये एस सी/एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने थेट आरक्षण न करता याचा चेंडू राज्य सरकारकडे टोलावला आहे.

2. देशातील नागरिकांच्या वयक्तिक माहितीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या आधार कार्डच्या वैधतेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खडपीठाने आधार घटनात्मक असल्याचा निर्णय दिला आहे. तर बँकिंग, मोबाईल सेवा किंवा इतर संस्थांच्या कामांसाठी आधार अनिवार्य नसल्याचं देखील यावेळी न्यायालयाने सांगितले आहे.

3. हायकोर्ट तसेच सुप्रीम कोर्टमध्ये चालणाऱ्या सुनावणीचे थेट प्रक्षेपणास परवानगी देण्याच्या निर्णयाचा ऐतिहासिक निर्णय देखील आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना देखील कोर्टाचे कामकाज पाहता येणार आहे.