fbpx

रायगड जिल्हयातल्या ९ शहरांतल्या ३९८ इमारती धोकादायक

टीम महाराष्ट्र देशा- रायगड जिल्हयातल्या नऊ शहरांतल्या तीनशे अट्ठ्याण्णव इमारती धोकादायक असल्याचं जिल्हा प्रशासनानं केलेल्या एका पाहणीतून समोर आलं आहे. यामध्ये दहा शासकीय इमारतींचा देखील समावेश आहे. यात कर्जत शहरात सर्वाधिक म्हणजे दोनशे सव्वीस इमारती धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागात इमारती कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनानं जिल्हायतल्या धोकादायक इमारती, पूल आणि धरणांचं सर्वेक्षण केलं, त्यातून ही माहिती समोर आली आहे.