पुण्यात 3 सराईस घरफोड्यांना अटक

पुणे  : घरफोडी करणा-या तीन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सचिन गोरखनाथ काळे (वय 40, रा. जुना ओटास्कीम, निगडी), संतोष लालाजी पवार (वय 30, रा. आझाद चौक, झोपडपट्टी, निगडी), हमीद अंतुम शिंदे (वय-25, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड) असे अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत.

निगडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. कृष्णानगर येथून जात असताना आरोपी मेघमल्हार हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये संशयतरित्या थांबले होते. त्यामुळे पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोन कापडी पिशव्या सापडल्या. त्यांनी मेघमल्हार हौसिंग सोसायटीमध्येच घरफोडीसह इतर गुन्हे केल्याचे कबूल केले. आरोपीकडून 2 लाख 97 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, चहर हजार 770 रूपयांचे मसाले, रोख रक्कम असा तीन लाख एक हजार 770 रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, तात्या तापकीर, मंगेश गायकवाड आदींनी केली.