निगडी आयटीआयसाठी तीन कोटींचा निधी मंजूर

girish bapat

पुणे : निगडी येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या (आयटीआय) इमारत विस्तारासाठी 2 कोटी 30 लाख आणि डागडुजीसाठी 60 लाख, असा एकूण 2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी पुणे जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला आहे.पुण्यातील सर्किट हाऊस येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

निगडी-आकुर्डी येथे 39 वर्षांपासून आयटीआय सुरू आहे.शहरात एकूण 18 दलित वस्ती निवडण्यात आल्या आहेत. त्यात एकूण 15 ठिकाणी विविध कामे केले जात आहेत. त्यातील 10 ठिकाणची कामे प्रगतिपथावर असून, 5 कोटी 11 लाख रुपयांच्या उर्वरित 5 कामांसाठी शहर सुधारणा समितीची मान्यता शिल्लक आहे. या 14 कामांचा एकूण खर्च सुमारे 4 कोटी 10 लाख आहे.या योजनेअंतर्गत दलित वस्त्यांमध्ये समाजमंदिर, स्वच्छतागृह, रस्ते आणि दिव्याबत्तीची कामे प्रामुख्याने केली जातात. विशेषतः स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत स्वच्छतागृह बांधणीस प्राधान्य दिले जात आहे. या योजनेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होतो. पूर्वी त्याचा पूर्ण विनियोग होत नव्हता. यंदापासून या योजनेतील कामांना गती दिली असून, हा निधी पूर्णपणे खर्च करण्याचे नियोजन असल्याचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले. ही कामे महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन योजना विभागाच्या वतीने केले जातात.Loading…
Loading...