IPL स्पॉन्सरशिपसाठी तीन कंपन्यात चुरस?

mumbai indians

नवी दिल्ली- काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिक यांच्यात संघर्ष झाला. यामध्ये २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. या घटनेनंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झालं.

चीन यांच्यामधील तणावाच्या वातावरणामुळे भारतात चिनी वस्तूंविरोधात संताप व्यक्त होऊ लागला आहे. क्रिकेटवरही याचा परिणाम झाला आहे. देशामध्ये होत असलेल्या तीव्र विरोधामुळे बीसीसीआयने अखेर गुरूवारी विवो या चिनी कंपनीसोबतचा करार मोडला आहे. त्यामुळे या वर्षी आयपीएलमध्ये विवो ही कंपनी प्रायोजक म्हणून असणार नाही.

बीसीसीआयने VIVO कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी सोशल मीडियावर दबाव वाढत होता. परंतू गव्हर्निंग काऊन्सिलने पहिल्यांदा VIVO कंपनीची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतू यानंतर देशभरात चाहत्यांची नाराजी व इतर जाहीरातदारांची नाराजी यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी VIVO सोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, InsideSports ने दिलेल्या वृत्तानुसार, Reliance Jio, Byju’s, Amazon आणि इतर काही कंपन्यांनी स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयसोबत चर्चा करायला सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण