एटीएस कडून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक; ‘अल कायदा’शी संबंध असल्याचा संशय

पुणे: एटीएस पणे टीमकडून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तिघेही बांगलादेशात बंदी असलेल्या अनसरुल्लाह बांगला (एबीटी) या संघटनेशी संबंधित आहेत. तसेच यांचा‘अल कायदा’शी संबंध असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

bagdure

१६ मार्च रोजी एटीएसला वानवडी आणि आकुर्डी परिसरात हे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, दहशतवादी पथकाने वानवडी परिसरात नेमका शोध घेतल्यानंतर त्यांनी एका बांगलादेशीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चौकशीदरम्यान त्याने इतर दोघे आकुर्डी परिसरात राहत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या लोकांकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड सारखी बनावट कागदपत्रे आढळून आली आहेत.

You might also like
Comments
Loading...