कोरेगाव भीमा दंगल: राहुल फटांगडेच्या हत्येतील आरोपी जेरबंद

शिरूर/ प्रमोद लांडे : 1 जानेवारी रोजी सणसवाडी आणि कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. यामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती तर अनेक जण जखमी झाले होते. तर जमावकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात राहुल बाबाजी फटांगडे (वय.३१) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

दरम्यान आता राहुलची हत्या करण्यात सहभाग असलेल्या तीन संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींना पंधरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी दिली आहे.

सणसवाडीतील दंगलीवेळी मूळचा कान्हुर मेसाईतील घोलपवाडीचा युवक असणाऱ्या राहुल फटांगडे याची जमावकडून हत्या करण्यात आली होती. आज बुधवार (दि.१०) रोजी त्याचा दशक्रिया विधी करण्यात आला. यावेळी राहुलच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती.