बक्षीसाची बतावणी करून साडेतीन लाख रुपयांनी फसवले

online shopping tips

पुणे  : भारती विद्यापीठ परिसरातील एका नागरिकाला अज्ञात इसमाने फोनद्वारे संपर्क साधत अडीच कोटी रुपयांचे बक्षीस लागल्याचे सांगत त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुकेश शेट्टी (वय-31, रा. आंबेगाव पठार, पुणे) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात इसमावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी सुकेश शेट्टी यांना एका अ्यक्तीने फोन करून तुम्हाला अडीच कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे, असे सांगितले.

बक्षीसाची ही रक्कम घेण्यासाठी त्या व्यक्तीने सुकेश शेट्टी यांना वेळोवेळी फोन करून चार्जेसच्या नावाखाली बँक खात्यामध्ये 3 लाख 60 हजार 500 रुपये भरण्यास सांगितले. हे पैसे भरल्यानंतरही बक्षीस न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेट्टी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे अधिक तपास करीत आहेत.