जात पंचांविरूध्द पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकी

jat panchayat law in maharashtra

अहमदनगर : जाती पंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्या प्रकरणी तिरमली जाती पंचायतीच्या 25 जणांच्या विरूध्द पोलीस ठाण्यात दाखल केलेली फिर्याद मागे घेण्याच्या कारणावरून फिर्यादी व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी देण्याची घटना घडली आहे. धमकी देणार्या 4 जणांच्या विरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर शिवराम भिंगारे, गंगूबाई शिवराम भिंगारे, बबिता शिवराम भिंगारे(तिघे राहाणार भेंडा फॅक्टरी,तालुका नेवासे) व पप्पू रंगनाथ उंबरे(राहाणार ढोरजळगाव,तालुका शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी बाबुराव फुलमाळी यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात चौघांच्या विरूध्द फिर्याद दाखल केली आहे. तिरमली जात पंचायतीच्या पंचांनी जातीतून बहिष्कृत केल्या प्रकरणी बाबुराव फुलमाळी या तरूणाने नगर तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वीच फिर्याद दाखल केलेली आहे. या फिर्यादीच्या आधारे पोलीसांनी सामाजिक बहिष्कृतता विरोधी कायद्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून तिरमली जात पंचायतीच्या तब्बल 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गंगा फुलमाळी,सर्जेराव फुलमाळी,शिवराम भिंगारे,उत्तम हनुमंता फुलमाळी,लक्ष्मण फुलमाळी, सुभाष फुलमाळी,उत्तम दौलत फुलमाळी,तात्या गायकवाड,रावसाहेब गायकवाड,साहेबराव उंबरे, आबा उंबरे, गुलाब काकडे, गंगा मले, साहिबा काकडे, रामा फुलमाळी,अप्पा काकडे,अण्णा फुलमाळी, साहेबा काकडे, रामा काकडे, सुभंष मले व गंगा फुलमाळी अशी गुन्हा दाखल झालेल्या तिरमली जात पंचायतीच्या लोकांची नावे आहे.या प्रकरणी बहुतेक सर्व जणांना अटक झाली असूुन सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत बंद आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार तिरमली समाजाच्या जात पंचायतीने समाजातील तब्बल 40 कुटुंबांना जातीतून बहिष्कृत केले आहे. बाबुराव फुलमाळी या युवकाने जात पंचायतीला विरोध केल्याने त्याला व त्याच्या परिवाराला देखील बहिष्कृत करण्यात आले. त्याविरोधात बाबुराव याने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने संबंधितांना अटक झालेली आहे. या पाश्र्वभूमीवर तिरमली जात पंचायतीच्या 25 जणांविरूध्द दाखल केलेली फिर्याद मागे घे,अन्यथा तुला विनयभंगा सारख्या गुन्ह्यात अडकवू,तसेच जिवे ठार मारू अशी धमकी दिल्याची फिर्याद बाबुराव फुलमाळी याने दिल्यानुसार पोलीसांनी जालिंदर भिंगारे,गंगूबाई भिंगारे,बबिता भिंगारे,व पप्पू उंबरे या चार जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे