Pune: श्रीमंत कोकाटे यांना धमकी देणा-या दोघांना अटक

शिवचरित्रकार श्रीमंत कोकाटे यांना धमकी देऊन सोशल मिडियावरुन अश्लिल मेसेज पाठविणा-या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
महेश रमेश गावडे (वय २३, रा़ भारती विदयापीठ, आंबेगाव पठार) आणि प्रणव विजय सुपेकर (वय २०, रा़ सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
याप्रकरणी श्रीमंत शिवाजी कोकाटे (वय ४५, रा़ सूर्यवंदन सोसायटी, शिवाजीनगर गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यांना १५ ते १९ फेब्रुवारी २०१७ दरम्यान मोबाईलवरुन फोन करुन शिवीगाळ करुन धमकी देण्यात येत होती़ त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्यांना एका सोशल मिडिया ग्रुपमध्ये सहभागी करुन घेण्यात आले़ त्यावरुन त्यांना बदनामीकारक अश्लील मेसेज पाठविण्यात आले़ त्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करेन, असा मेसेज पाठवून ते या ग्रुपमधून बाहेर पडले़ १३ मार्च ला रात्री त्यांच्या मोबाईलवर फोन करुन शिवीगाळ करुन धमकाविण्यात आले़ त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली़ शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर केले़ या गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक करायची असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली़ न्यायालयाने ती ग्राह्य धरुन दोघांना १८ मार्चपर्यंत पालीस कोठडी मंजूर केली.