एक्स गर्लफ्रेंडला अडचणीत आणण्यासाठी त्याने दिली सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी

मुंबई : राजधानी मुंबईस्थित जगप्रसिद्ध सिद्धी विनायक गणेश मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून हे मंदिर उडवून देण्याची देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता ही धमकी देणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेयसीच्या बदनामीसाठी प्रियकरानेहा मेसेज लिहिल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. ठाणे पोलिसांनी आरोपी केतन घोडकेला अटक केली आहे.

‘दुश्मन पर फतेह’, JIHAD-UL-AKBAR-TAEGET DADAR SHIDHI VINAYAYAK “BOOM”’, असा मेसेज देऊन दादरमधील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

Loading...

Gazva-E-Hind आणि ISIS या दहशतवादी संघटनेने हा संदेश लिहिल्याचा बनाव करण्यात आला होता. यानंतर विवियाना मॉल आणि आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवली होती. तसंच एटीएसलाही कळवलं होतं.

पत्रकावरील मोबाईल नंबरवरुन मुलीचा शोध घेऊन तिची विचारपूस करण्यात आली. आपली बदनामी व्हावी आणि पोलिसांकडून त्रास व्हावा यासाठी एक्स-बॉयफ्रेण्ड केतन घोडकेने हे कृत्य केल्याचं संशय तरुणीने व्यक्त केला.

यानंतर केतन घोडकेला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. यानंतर वर्तक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा क्रमांक 1281/2019, भादविच्या कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरु आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश