fbpx

‘खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्या,अन्यथा तुम्हाला देवाघरी पाठवू’

students

नागपूर : धनगर-मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. नागपूर शहरातील बस स्टॉपवर काही आक्षेपार्ह मजकूर असणारे कागद चिकटवण्यात आले आहेत. यामधून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकार आणि कंपन्यांना उद्देशून थेट धमकी देण्यात आली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे या पत्रकात ?

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा. आमच्याकडे शूटर्स आणि हल्लेखोर आहेत. ही धमकी गांभीर्यानं घ्या. अन्यथा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना देवाघरी पाठवू.