‘राज ठाकरे यांच्या मागे तर हजारो मते आहेत’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यातच महाराष्ट्रात तर नव्या राजकीय समीकरणांची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहेत. मनसेने राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा मागितल्याची चर्चा असताना, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे आघाडीसोबत आल्यास फायदाच होईल, असं मत व्यक्त केलं. ते सोलापुरात बोलत होते.

भुजबळ म्हणाले, “राज ठाकरे यांच्याशी जागावाटपबाबत काही चर्चा सुरु आहे की नाही याबाबतची माहिती मला नाही. मात्र राज ठाकरे आघाडीसोबत आल्यास त्याचा फायदाच होईल. आम्हाला एक एक मताची गरज असताना, राज ठाकरे यांच्या मागे तर हजारो मते आहेत. ते मोदी सरकारच्याविरोधात असल्याने त्यांचा फायदाच होईल”

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा