औरंगाबादमध्ये व्हिडीओकॉनचे हजारो कर्मचारी 12 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर

Vcon logo new

औरंगाबाद : औरंगाबादमधील चितेगाव येथील व्हिडीओकॉन कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांना १२ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. रजा का देण्यात आली आहे याबाबत काहीही माहिती देण्यात आली नसल्यामुळे कर्मचा-यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading...

येथील व्हॅल्यू रेफ-१ व सोकेश-२ या युनिटमध्ये फ्रिज तसेच वॉशिंग मशीन, मोबाईल, एसी आणि इतर घरगुती उपकरणांची निर्मिती केली जाते. येथे ६ हजार ४५९ कर्मचारी कार्यरत आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच नवीन वर्षाच्यानिमित्ताने ५ जानेवारी २०१८ पर्यंत सुट्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा १८ जानेवारीपर्यंत रजा असल्याचे कर्मचा-यांना सांगण्यात आले.Loading…


Loading…

Loading...