fbpx

राज्यातील हजारो शिक्षकांनी मागीतली मुख्यमंञ्याकडे इच्छा मरणाची परवानगी !

निलंगा : विविध आंदोलने करुनही राज्य सरकार वेतन अनुदान मंजूर करत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील हजारो शिक्षकांनी वैफल्यग्रस्त भावनेतून आपले जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे ! राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे निवेदन देवून चक्क “इच्छा मरणा”ची परवानगी मागीतली आहे.राज्यातील २० टक्के अनुदान प्राप्त शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान मिळावे,अघोषित शाळा निधीसह घोषीत कराव्यात आदी मागण्याबाबत संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे मागील १७-१८ वर्षापासून वारंवार पाठपुरावा सुरु आहे.

या न्याय मागणीबाबत राज्यभर अनेक आंदोलने झाली.दरम्यान शासनाकडून याबाबत आश्वासनेही अनेक मिळाली.परंतु अद्याप शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.या मागणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये ५ आँगस्ट पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे.शासनाने याप्रकरणी तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा स्वातंत्र्य दिनी १५ आँगस्ट रोजी आमच्या कुटुंबासमवेत आपल्याला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी अशी धक्कादायक मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे.

वेतन अनुदानाची आमची न्याय मागणी असतानाही शासन आमच्या मागणीचा सहानभूतीपूर्क विचार करत नसल्यामुळे आमच्यामध्ये कमालीची नैराश्याची भावना पसरल्यामुळे आम्ही हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे कायम विना अनुदान कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी भ्रमणध्वनीवरुन “महाराष्ट्र देशा”शी बोलताना सांगितले.कोल्हापूर जिल्ह्यातील आगर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला २० टक्के अनुदान आहे. आपण या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून आपल्या बरोबरच कांबळे निता जनार्दन,पाटील जयश्री जगदीश,माछरेकर पृथ्वीचंद लालचंद,वागुल नितीन एकनाथ,दाभाडे सुप्रिया अजितसिंह,पोवार सर्जेराव बापू,ढोकळे उदय वसंत व भारमल वैशाली अनिल या शिक्षकांनी मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाव्दारे इच्छामरणाची मागणी केल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

या मागणीसाठी राज्यातील हजारो शिक्षकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केल्याचे जगदाळे यांनी सांगितले.कृती समितीचे लातूर जिल्हाध्यक्ष दिनकर निकम यांनी जिल्ह्यातील २०० शाळेतील १ हजार शिक्षकांनी इच्छा मरणाची परवानगी मागीतल्याचे ” महाराष्ट्र देशा”शी बोलताना सांगितले.या मागणीच्या पार्श्वभूमीवर वेतन अनुदानाच्या या मागणीबाबत मुख्यमंत्री फडणवीस नेमका काय निर्णय घेणार याबाबत राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये कमालीचे औत्सुक्य लागून राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या