पावसाअभावी नगर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल

शेतकऱ्यांचे वरून राजाच्या आगमनाकडे डोळे

राजेंद्र साळवे ,राहुरी (प्रतिनिधी)-अहमदनगर जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण नगण्य झाले
bagdure
असल्याने बळीराजा पुन्हा एकदा धास्तावल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे.
शेतीसाठी लागणारे औजारे असोत की बी-बीयाणे खरेदीसाठी असनारी गर्दीची झुंबड़ आता ओसरल्याची चित्रे दुकानांसमोर दीसत आहे.बळीराजा नुकताच मागे झालेल्या शेतकरी संपामधे होरपळला असल्याने आता परत पावसाने म्हणावी तशी साथ न दील्याने आपला संसारीक गाड़ा कसा पुढे न्यायचा या  चिंतेने परत एकदा शेतकरी ग्रासला आहे.मुलींचे उच्च शिक्षण ,स्वतःचे अरोग्य, येणारे धार्मिक सणसुद  आदी साठी खर्च करण्यास अडचण जाणवणार आहे ,अशी व्यथा राहुरी तालुक्यातील म्हैसगाव, कणगर, बुळेपठार , चिंचविहीरे, तसेच देवळाली प्रवरा आदी गावातील शेतकऱ्यांनी  मांडली. शासनाने कर्जमाफी केली असली तरी कमी क्षेत्र असलेल्या शेतकरी यांनी तुटपुंज्या रकमेत प्रपंच कसा चालवायचा हा मोठा प्रश्न आम्हाला भेड़सावत आहे.आकाशात आभाळ दाटुन येतात परंतु पावासाचे म्हणावे तसे आगमन होत नसल्याने विहीरी अजुनही कोरड़्याच आहे.किमान दोन ते तीन पाउस हे मोठ्या अपेक्षेचे आहेत असे देवळारी प्रवरा येथील दत्तात्रय गागरे या शेतक-याने महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगीतले.
You might also like
Comments
Loading...