दुष्काळी मदतीसाठी हजारो शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको

टीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्ह्यात सर्वत्र अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ जन्य परिस्थिती उदभवली असून पिण्याच्या पाणी, जनावरांना चारा ,पाणी ,2019-2020 खरीप हंगामातील लागवड झालेल्या पिकांचे सरसकट नुकसानीचे महसूल प्रशासनाने पंचनामे करून एकरी सरसकट 1 लाख रुपये मदत शासनाने देण्याच्या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हजारो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी बीड परळी महामार्गावर घाटसावळी रास्ता रोको केला.

या रास्ता रोकोला हजारो शेतकरी जमल्यामुळे बीड -परळी महामार्ग 2 तास ठप्प झाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिकाताई ढगे पाटील,युवती शेतकरी नेत्या पुजाताई झोळे, बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी आंदोलनात आपले मनोगत व्यक्त केले सरसकट दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाख रु. मदत तात्काळ देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याची मागणी वक्त्यांनी केली. तात्काळ मदत न दिल्यास येणाऱ्या निवडणुकीत सर्व पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा रसिका ढगे पाटील यांनी दिला .दुष्काळ ग्रस्त भागातील माणसांना शुद्ध पिण्याचे पाणी जनावरांना मुबलक चारा ,पाणी सरकारने देऊन आधार देण्याची गरज असल्याचे मत पूजा झोळे यांनी मांडले.

Loading...

आंबेसावळी ,वलीपुर ,जवळा तांडा आदी गावातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली मात्र प्रशासनाने याची दखल न घेतल्यास दुष्काळ ग्रस्त शेतकरी यापुढे हिंसक आंदोलन करतील असा आक्रमक इशारा आंदोलकांनी शासनाला दिला.

निवेदनात शेतकऱ्यांनी अनेक मागण्या पुढीलप्रमाणे

१)शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सरसकट कर्जमुक्त करावे.

२)बीड जिल्ह्यात सर्व महसूल मंडळात सरसकट दुष्काळ जाहीर करून पिकांचे 100%नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत व एकरी 1 लक्ष रु मदत अनुदान वितरित करावे.

३)बीड जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे नैसर्गिक चारा व पाणी मुबलक उपलब्ध झाले नाही त्यामुळे जनावरांना व नागरिकांना जगवण्यासाठी विशेष दुष्काळ निवारण कृती आराखडा तयार करून ‘पायलट योजना’राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

४)बेरोजगार युवकांचे अण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विनाविलंब पात्र कर्जाची प्रकरणे निकाली काढावीत.

५)रोजगार हमी योजने अंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना प्राधान्य देऊन रोजगार तात्काळ उपलब्ध करावा.

६)शेतकऱ्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे

७)चालू खरीप हंगाम2019-2020 चा पीकविमा तात्काळ मंजूर करून वाटप करावा.

८) अतिरिक्त इन्शुरन्स च्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस न धरता निर्दोष शेतकऱ्यांना पीकविमा तात्काळ वाटप करावा

९) दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना एस. टी. पास मध्ये सवलती देऊन शैक्षणीक शुल्क माफ करावेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण