‘मनसेच्या बदललेल्या झेंड्यापेक्षा विचार महत्वाचे ठरणार आहेत’

टीम महाराष्ट्र देशा – कोणत्या झेंड्याची निवड करायची हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे . परतू झेंड्या पेक्षा विचार महत्वाचे आहेत. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी लोकसभा आणि विधानसभेत मोठमोठ्या सभा घेऊन भारतीय जनता पक्षाला टोकाचा विरोध केला होता, ती भूमिका ते बदलतील असं आपल्याला वाटत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन ध्वज आणि हिंदुत्वाकडील संभाव्य वाटचालीवर बोलताने दिली.

तसेच मनसेने आधी मराठी माणसांच्या बाबतीत टोकाची भूमिका घेतली होती नंतर ती मावाळ झाली. नंतर भाजप आणि मोदि-शाह यांच्या जोडीविरीद्ध प्रचार केला होता. आणि त्यांची हीच भूमिका कायम राहील अस आपल्याला वाटत. राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली तर ही त्यांचाच विचारांशी प्रतारणा ठरेल.

Loading...

तसेच पुढे ते म्हणाले,मनसेतर्फे शॅडो कॅबिनेटची स्थापना होणार असल्याची माहिती स्वागतार्ह आहे. अभ्यासपूर्ण विरोध होत असेल तर विचारांचे स्वागतच आहे. विरोध आंधळा नसावा. राज्याच्या प्रगतीसाठी काही गोष्टींना विरोध होत असेल तर ते चांगलेच आहे.

काल राज ठाकरे यांनी मनसेच्या पहिल्या महा अधिवेशनात पक्षाचा नवीन ध्वज आणि हिंदुत्ववादी विचारांकडे वाटचाल करेल असे संकेत दिले होते .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात