माझा पक्ष रिजनल असला, तरी ओरिजनल आहे : उद्धव ठाकरे

मनसे फोडल्याच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

मुंबई : माझा पक्ष शिवसेनाप्रमुखांनी दुसऱ्याचा पक्ष फोडून स्थापन केलेला नाही. माझा पक्ष रिजनल असला, तरी ओरिजनल आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी राज ठाकरेंच्या मनसेवर भाष्य केलं.

bagdure

नेमकं काय म्हणाले उध्दव ठाकरे?

‘जो पक्ष माझा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करुनच स्थापन झाला होता तो पक्ष फुटला म्हणजे नेमकं काय झालं? माझी पार्टी ही रिजिनल पार्टी असली, तरी ती ओरिजनल आहे. माझी पार्टी शिवसेनाप्रमुखांनी दुसऱ्याचा पक्ष फोडून स्थापन केलेली नाही. ती शिवसेना म्हणूनच स्थापन झाली आणि शिवसेना म्हणूनच आहे आणि ती शिवसेना म्हणूनच राहील. माझ्याच पक्षातून गेलेली माणसं नंतर पक्षात परत आली, तर त्यात फोडाफोडी कुठून आली? जे तुम्ही घेऊन गेला होतात ते माझ्याकडे परत आलं असेल तर मी कुठे काय फोडलं? विचार तोच, माणसं तीच, नवीन काय केलंत? निर्माण काय केलंत’?

You might also like
Comments
Loading...