‘ज्यांच्या पक्षाचे लोक फरारी आहेत, त्यांनी देशमुखांवरून प्रश्न विचारू नये’, मलिकांचा दरेकरांवर पलटवार

मुंबई : गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर सीबीआयने सुरू केलेल्या तपासाच्या आधारे ‘ईडी’नेदेखील चौकशी सुरू केली. ‘ईडी’ने त्यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावले. पण देशमुख एकदाही समोर आलेले नाहीयेत. तसेच ते कुठे आहेत हे देखील माहिती नाहीये. त्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख सध्या कुठे गायब आहेत हे राष्ट्रवादीने जाहीर करावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले होते.

यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. मलिक म्हणाले, ‘ते त्यांच्या परिवारासोबत आहेत, राज्यात आहेत, देशात आहेत. पण तरीही ते फरारी आहेत का? हद्दपार आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्यांच्या पक्षाचे नेते हद्दपार आहेत, ज्यांच्या पक्षाचे लोक फरारी आहेत त्यांनी याप्रकरणी प्रश्न विचारू नयेत असा पलटवार मलिक यांनी केला आहे.

काय म्हणाले होते प्रवीण दरेकर?
अनिल देशमुखांवरून प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ‘अनिल देशमुख हे राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त कुठे बेपत्ता आहेत कळत नाही. ते मुंबई आहेत का कुठे हे कळत नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस आयुक्तांनी देशमुख कुठे आहेत हे सांगायला पाहिजे. आपल्या खात्यातील माणूस कुठे आहे हे महित नसणे यावरून पोलिस खात्यात काय गोंधळ सुरू आहे हे दिसत आहे. देशमुख कुठे आहेत याची माहिती राष्ट्रवादीने द्यावी असे आवाहन दरेकर यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :