Share

“ज्यांचे आयुष्य समाजात जातीय तेढ निर्माण करण्यात गेले त्यांनी…”, भातखळकरांची शरद पवारांवर टीका

मुंबई : देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण चांगलेच पेटले असल्याचे दिसून येत आहे. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही यावर भाष्य केले. तसेच समाजामध्ये पुन्हा दुरावा निर्माण होईल अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करणे टाळायला हवे, असे पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,’ज्यांचे आयुष्य समाजात जातीय तेढ निर्माण करण्यात गेले, त्यांनी द कश्मिर फाईल्स सारख्या सिनेमावर न बोललेलं बरं.’

दरम्यान, काश्मिरमध्ये जे काही घडलं आणि जे सध्या दाखवले जात आहे त्यामध्ये फरक आहे. त्यावेळी देशाचे नेतृत्व हे काँग्रेसकडे नसून विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याकडे होते. भाजपच्या पाठबळामुळेच या कालावधीत मुफ्ती मोहमम्मद सईद हे देशाचे गृहमंत्री झाले होते. तेव्हा जम्मू-काश्मिरमध्ये राज्यपाल राजवट होती. तसेच समाजामध्ये पुन्हा दुरावा निर्माण होईल अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करणे टाळायला हवे, असे पवार म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई : देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण चांगलेच पेटले असल्याचे दिसून येत आहे. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक …

पुढे वाचा

India Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now