भारताविरोधात जे बोलतील त्यांना एन्काऊंटरमध्ये मारलं जाईल; भाजपच्या मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

shukla

नवी दिल्ली : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी नुकतीच उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली होती. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईन, असा इशाराच त्यांनी दिला होता.घर विकणे आहे, असा बोर्ड मी माझ्या घरावर लावेल. माझा योगींना आक्षेप नाही. पण योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हे आवश्यक नाही. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून देईल, असं राणा म्हणाले होते .

राणा यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधीलराज्यमंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी राणा यांना उद्देशून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “मुन्नवर राणांसारख्या लोकांना केवळ उत्तर प्रदेश नाही तर देश सोडून जायला हवं. इतकंच नाही तर भारताविरोधात जे बोलतील त्यांना एन्काऊंटरमध्ये मारलं जाईल” असं आनंद स्वरुप शुक्ला म्हणाले.

आनंद स्वरुप शुक्ला म्हणाले, मुनव्वर राणा हे त्या लोकांपैकी आहेत, जे 1947 फाळणीनंतर भारतात थांबले आणि देशाला आतून पोखरण्याच्या कटात सहभागी झाले. पुढे बोलताना शुक्ला यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या यूपी दौऱ्यावरुनही निशाणा साधला. प्रियांका गांधी वाड्रा या राजकीय पर्यटक आहेत. दीड वर्षानंतर यूपीचं वातावरण आणि पाऊस बघण्यासाठी त्या आल्या आहेत, असं आनंद स्वरुप शुक्ला म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP