राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही, कडक कारवाई होणारच – मुख्यमंत्री

blank

मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

दोन माथेफिरुंनी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार केल्याचा आरोप आहे. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे.

दरम्यान, या घटनेचे समाज माध्यमांवर पडसाद पाहायला मिळत आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले असून राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचं काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का, शिवसेनेचा फडणवीसांवर जोरदार घणाघात

बाळासाहेब ठाकरेंच्या काळातल्या ‘सामना’ची आज काय अवस्था झाली, फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

सारथी संदर्भात उद्या अजित पवारंनी मला चर्चेसाठी निमंत्रण दिलंय – खा. संभाजीराजे