‘ज्यांनी साडेचार वर्षांत काही केले नाही ते ३ महिन्यांत काय करणार’

टीम महारष्ट्र देशा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती सरकार मोठमोठी आश्वासने देत आहे, पण ज्यांनी साडेचार वर्षांत काही विकासकामे केली नाहीत, ते लोकसभा निवडणुकीपूर्वी ३ महिन्यांत काय कामे करणार, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते.

अमेरिकेत एका हॅकरने गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम घोटाळ्यामुळे झाल्याचा आरोप केला आहे. सरकार त्यावर चौकशी करण्याचा काही विचार करत नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आली, तर या सर्व प्रकरणाची चौकशी करू आणि दोषींवर आम्ही कारवाई करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सभेत दिले.

ज्यांनी साडेचार वर्षांत काही विकासकामे केली नाहीत, ते लोकसभा निवडणुकीपूर्वी ३ महिन्यांत काय कामे करणार, असा प्रश्न उपस्थित करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली.