fbpx

ज्यांनी देशाची फसवणूक केली त्यांना मलकापुरची जनता फसली नाही – पृथ्वीराज चव्हाण

कराड – ज्यांनी देशाची फसवणूक केली त्याच भाजपाच्या नावाखाली मलकापुरात इथल्या स्थानिक नेत्यांनी मते मागितली होती, पण मलकापुरची जनता यांना फसली नाही. मलकापूर ही महाराष्ट्रातील आदर्श नगरपालिका करून दाखवण्यासाठी आता आपण प्रयत्न करू यात. निवडणुकीत दिलेले प्रत्येक आश्वासन पुर्ण करण्यासाठी नगराध्यक्षांसह सर्व विजयी नगरसेवकांच्या पाठीशी मी स्वतः उभा आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

मलकापूर येथे नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी चव्हाण म्हणाले , मलकापुरची लोकसंख्या ज्या वेगाने वाढली त्या तुलनेत मलकापुरला नागरी सुविधा दिल्या आहेत. जे विकास करतात त्यांच्या पाठिशी मलकापुरची जनता आजपर्यंत राहिली आहे. देशात ज्यांनी फसवणूक करून सत्ता मिळवली त्यांना मलकापुरवासियांनी थारा दिला नाही.